Tuesday, October 30, 2007

मराठी अनुदिनी

नमस्कार
मराठी ’अनुदिनी’ सुरु करण्याचा विचार डोक्यात ब‍र्‍याच दिवसांपासून होता. अखेर आज मुहूर्त लागला. इथे खास काही भरीव साहित्यिक वगैरे लिहिण्याचा विचार नसून सहज मनात आलेलं तुमच्यापुढे मांडणार आहे. विषयाचे बंधन नसेलच पण नियमिततेचेही ठेवलेले नाहीये. :)

बर्‍याच वेळेला या ना त्या निमित्ताने काही काही विचार डोक्यात येत असतात. ते त्या त्या वेळीच नोंदवले गेले नाहीत तर नंतर राहूनही जाते आणि त्यातली गंमतही कमी होते. अशा वेळी ’अनुदिनी’ हा प्रकार उपयोगी पडेल असे वाटते. ’मराठी ब्लॉग विश्व' आता वयात येते आहे, ह्या सुमुहूर्तावर आपलीही एक अक्षता असावी एवढाच प्रयत्न...